पुणे : आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे जास्तीत जास्त आमदार आणि नगरसेवक निवडून आणण्यासाठी चार माजी नगरसेवकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या चारही माजी नगरसेवकांकडे प्रत्येकी दोन दोन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. संपूर्ण शहर पिंजून काढत पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणात शहरातील ताकत वाढविण्याचे आव्हान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांपुढे आहे. शिवसेनेतील फुटीनंतर अपवादवगळता शहरातील पदाधिकारी फारसे फुटले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीवर ठाकरे गटाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी चार माजी नगरसेवकांना विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा – पुणे : कोथरूड भागात रिक्षावर झाड कोसळून चौघे जखमी

हेही वाचा – पिंपरी : महापालिकेच्या नवीन थेरगाव, भोसरी रुग्णालयात ‘डीएनबी’ अभ्यासक्रम, राष्ट्रीय परीक्षा बोर्डाची मान्यता

माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्याकडे कोथरूड आणि शिवाजीनगर या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. बाळासाहेब ओसवाल यांच्याकडे पर्वती आणि खडकवासला, विशाल धनवडे यांच्याकडे कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट आणि संजय भोसले यांच्याकडे वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ सोपविण्यात आले आहे. हे चारही माजी नगरसेवक या मतदारसंघात निवडणूक समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. पक्ष संघटना मजबूत करणे, विविध कार्यक्रम घेणे, मतदारसंघाच्या माध्यमातून शहर पिंजून काढण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे.
दरम्यान, या नव्या जबाबदारीतून पक्ष संघटना वाढविण्यात येईल, असा विश्वास या सर्व नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group prepares for assembly election responsibility on four former councillor pune print news apk 13 ssb
Show comments