मद्यपान करून भरधाव मोटार चालवित सहा जणांना जखमी केलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने शुक्रवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी संध्याकाळी डेक्कन जिमखाना येथे संध्याकाळी ही घटना घडली होती.
महेश मारुती सरदेसाई (वय ३८, रा. साई व्हिला, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरदेसाई याने भरधाव मोटार चालवित डेक्कन जिमखाना बसस्थानकाजवळ चार दुचाकी, एक रिक्षा, पाणीपुरी गाडी यांना उडविले होते. यामध्ये रिक्षातील दोघे, दुचाकीवरील एक तरुण आणि तरुणी आणि पाणीपुरीवाला, तीन दुचाकीवरील असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तरुणीची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर पळून जाताना नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी सरदेसाई याला पकडले होते.
सहा जणांना जखमी करणाऱ्या मोटार चालकास पोलीस कोठडी
मद्यपान करून भरधाव मोटार चालवित सहा जणांना जखमी केलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने शुक्रवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
First published on: 22-11-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: That drunk motordriver gets police custody