इतिहासाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. सदानंद मोरे यांना आलेला धमकीचा दूरध्वनी अमेरिकेतून आल्याचे तपासात स्पष्ट आले आहे. पोलिसांच्या  सायबर शाखेच्या तपासात ही बाब समोर आली आहे.
दूरचित्रवाणी वाहिनीवरील एका कार्यक्रमात डॉ. मोरे यांनी नरेंद्र मोदी आणि फॅसिस्टवाद याबाबत जाहीर भाष्य केले होते. त्याचबरोबर त्यांनी लता मंगेशकर यांच्यापासून ते सध्याची राजकीय स्थिती, २०१४ च्या निवडणुकांवर भाष्य केले होते. देशात फॅसिस्ट विचारांचे सरकार आले तर देशापुढे व समाजापुढे मोठा धोका असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले होते. या कार्यक्रमानंतर त्यांना जिवे मारण्याच्या धमकीचा दूरध्वनी आला होता. त्याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्यांना सध्या सुरक्षा पुरविण्यात आली आहे.