पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए) अभ्यासक्रमासाठीचा प्रारुप आराखडा विकसित केला आहे. तीन आणि चार वर्षांसाठीच्या या अभ्यासक्रमात उद्योग क्षेत्राच्या गरजा, उदयोन्मुख कल विचारात घेण्यात आले असून, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर अनुभव मिळण्यासाठी कार्यप्रशिक्षणही समाविष्ट करण्यात आले आहे. उच्च शिक्षण संस्थांनी हा अभ्यासक्रम स्वीकारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश एआयसीटीईने दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एआयसीटीईने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. बीबीए, बीएमएस, बीसीए हे अभ्यासक्रम यंदापासून एआयसीटीईने आपल्या अखत्यारित घेतले. त्यामुळे या अभ्यासक्रमांना आता एआयसीटीईची नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय नवा अभ्यासक्रम विकसित करण्याचे एआयसीटीईकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी मिळून बीबीएसाठीचा नवा अभ्यासक्रम विकसित केला आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा, मागण्यांसह मुलभूत तत्त्वे, उदयोन्मुख कल लक्षात घेऊन तीन आणि चार वर्षे बीबीए अभ्यासक्रमासाठी १२० ते १६० श्रेयांकांचा प्रारुप अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>मावळमध्ये महायुतीत फूट, भाजपच्या बाळा भेगडेंसह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; अपक्ष बापू भेगडेंना पाठिंबा

प्रारुप अभ्यासक्रमामध्ये आंतरविद्याशाखीय शिक्षण, अनुभवाधिष्ठित कार्यपद्धती, उद्योगसंबंधित प्रकल्पांवर भर देण्यासह समस्या सोडवण्याची क्षमता, चिकित्सक विचार, परिणामकारक संवाद कौशल्ये या अभ्यासक्रमातील मुलभूत घटक आहेत. उद्योग आणि शिक्षण यातील दरी दूर करण्यासाठी कार्यप्रशिक्षणाचाही (इंटर्नशीप) समावेश करण्यात आला आहे. प्रारुप अभ्यासक्रम समजून घेऊन उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या स्थानिक गरजांनुसार त्यात बदल करण्याची मुभा आहे.  या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्याबरोबरच नवसंशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याचे एआयसीटीईने नमूद केले आहे. 

राज्य समाइक प्रवेश कक्षाकडून (सीईटी सेल) बीबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत प्रवेशाद्वारे राबवण्यात आली आहे. गेल्यावर्षीपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर राबवण्यात येत होती.