लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: घरात राहू नको, असे सांगितल्याने चिडलेल्या घरजावयाने सासूच्या अंगावर गरम पाणी फेकून तिला मारहाण केली. सासूचे डोके फरशीवर आपटल्याने तिचे दात पडले. या प्रकरणी घरजावयाला खडकी पोलिसांनी अटक केली.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”

सुजाता कैलास शिंदे (वय ५०) असे जखमी झालेल्या सासूचे नाव असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी महेंद्र सिद्धनाथ तोरणे (वय २५, रा. आर्मी क्वार्टर, सर्वत्र विहार, मुळा रस्ता, खडकी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सासू सुजाता शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. सुजाता शिंदे खडकीतील दारूगोळा कारखान्यात कामाला आहेत. शिंदे यांची मुलगी आणि जावई तोरणे त्यांच्याकडे राहायला आहे. जावई तोरणे याच्याशी त्यांचा वाद झाला. शिंदे यांनी त्याला घरात राहू नको, असे सांगितले.

हेही वाचा… पुणे : ‘या’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आठ हजार रुपये विद्यावेतन

त्यानंतर तोरणेने सासूच्या अंगावर गरम पाणी ओतले. सासूचे डोके फरशीवर आपटले. मारहाणीत सासूचे दोन दात तुटले. सासू सुजाता शिंदे यांच्या चेहऱ्यावर गरम पाणी फेकल्याने त्या भाजल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक बेंदगुडे तपास करत आहेत.

Story img Loader