पुण्याच्या मावळमध्ये शिरगाव परिसरात पवना नदीच्या काठी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मावळमधील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी भट्टी दारू तयार केली जाते, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलीस कर्मचारी सदानंद रुद्राक्ष आणि प्रदीप शेलार यांना इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड मारून गावठी हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त केला आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘इतकी’ पदे होणार निर्माण; लवकरच नोकर भरती

हेही वाचा – पिंपरीत शासकीय वसतिगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केलं नाही; एबीव्हीपीचे पदाधिकारी आक्रमक

यामध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे दहा हजार लिटर रसायन, तीस गुळाच्या ढेप असा एकूण सात लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अश्विनी राहुल ननावत या महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The anti narcotics team took action on the gavathi hatbhatti on the banks of pavana river in shirgaon area kjp 91 ssb