पुणे : पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्त उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दिलेल्या आदेशाला डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ठाकूर यांच्या विरोधात निकाल दिला आहे.

या प्रकरणी तत्कालीन अधीक्षक डॉ. विनायक काळे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दावा दाखल केला होता. डॉ. काळे यांची अचानक बदली करण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने ठाकूर यांची नियुक्ती रद्द करून पुन्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

हेही वाचा… पुण्यात घरांची खरेदी जोरात! ऑक्टोबर महिन्यात तब्बल ११ हजार ८०८ कोटींचे व्यवहार

डॉ. काळे हे जे. जे. रुग्णालयाच्या उपअधिष्ठाता पदावरून पदोन्नतीने दीड वर्षांपूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी रूजू झाले होते. मात्र, तीन वर्षांच्या आतच त्यांची जानेवारीमध्ये अधिष्ठाता पदावरून बदली करण्यात आली होती. त्यांची नियुक्ती ससून रुग्णालयातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी करण्यात आली होती, तर अधिष्ठातापद डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यावेळी डॉ. ठाकूर हे सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते.

हेही वाचा… महामेट्रो-महापालिका यांच्यातील वादात सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा खोळंबा!

या निर्णयाच्या विरोधात काळे यांनी मॅटकडे धाव घेतली होती. या प्रकरणी मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे या निर्णयाला डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर उच्च न्यायालयाने डॉ. ठाकूर यांची अधिष्ठाता म्हणून नियुक्ती रद्द करून काळे यांच्याकडे हे पद पुन्हा सोपविण्याचे आदेश दिले आहेत.