गेल्या काही दिवसांपासून श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या सात विश्वस्तांच्या निवडीवरून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू आहे. मात्र धमार्दाय आयुक्त पुणे यांनी नियमानुसारच सात विश्वस्तांची निवड केल्याची माहिती ‘श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’चे अध्यक्ष पोपटराव खोमणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसंच नवनियुक्त विश्वस्त हे राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचा आरोप चुकीचा असून या निवडीमध्ये सर्वसमावेशक व्यक्तिंना पसंती देण्यात आल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. तेव्हा पंधरा दिवसापासून ग्रामस्थांनाकडून सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती विश्वस्तांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. या पत्रकार परिषदेला डॉ. राजेंद्र खेडेकर, अ‍ॅड. विश्वास पानसे, अभिजीत देवकाते, अ‍ॅड. पांडुरंग थोरवे, अनिल सौंदडे उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या ठिकाणी विश्वस्त हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच हिंदू धर्मातला असावा, पुरुष किंवा स्त्री असावा एवढेच स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी स्थानिकत्वाचा कोणताही मुद्दा नाही. २०१२ च्या घटना दुरुस्तीमध्ये पुणे किंवा सासवड बार असोसिएशनचा एखादा पदाधिकारी विश्वस्त म्हणून असावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसारच धर्मादाय आयुक्त यांनी सर्व विश्वस्त नेमलेले आहेत. देवस्थानच्या विश्वस्त पदासाठी तब्बल ४७९ जणांनी अर्ज केले होते, त्यातील ९५ अर्ज बाद झाले आणि जवळपास ३०० पेक्षा जास्त जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विश्वस्तांना त्यांच्या मुलाखतीमध्ये विविध क्षेत्रातील प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये सामाजिक विषयांसोबतच मंदिर व्यवस्थापन, दैनंदिन दिनचर्या, पूजा अर्चा, श्री खंडोबा दैवत याविषयी माहिती, आपत्कालीन व्यवस्थापन असे अनेक विषय होते. यावरुनच निवड करण्यात आल्याची माहिती पोपटराव खोमणे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा… पुणे: वाघोलीतील तलाठी कार्यालयात दलालांना पकडले

हेही वाचा… पुणे: जमिनीच्या वादातून हाणामारी; तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

जेजुरी गडावर विविध प्रकल्प येत्या काळात राबवले जाणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामस्थांचे विश्वस्त पदावरून जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन मागे घेण्यात यावे आणि आपण एकत्रित विकास काम करू हीच आंदोलनकर्त्यांना विनंती असल्याची भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The appointment of jejuri devasthan trustees is as per the rules and regulations claims by the president of devasthan appealed to the villagers to withdraw the agitation svk 88 asj