लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता महिला आणि पुरुषांसाठीच्या स्वच्छतागृहांची कमरता असताना मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेली स्वयंचलित ई-टाॅयलेट्स बंद असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. १५ पैकी जेमतेम तीन ई-टाॅयलेट्स सुरू आहेत. मात्र, सुरू असलेल्या स्वच्छतागृहांचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Jugeshinder Singh, CFO of Adani Enterprises.
Hindenburg : “कितने गाझी आये, कितने गाझी गये”, हिंडनबर्ग बंद करण्याची घोषणा; आदाणी समूहाचा टोला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
mumbai sindhudurg air plane
मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा दोन महिने बंद
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
tata education trust provision
टीसच्या कर्मचाऱ्यांना मार्च २०२६ पर्यंत दिलासा, टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून ११५ कर्मचाऱ्यांसाठी भरीव तरतूद

सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता लक्षात घेत गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी खासदार विकास निधीतून भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी अत्याधुनिक आणि स्वयंचलित ई-टाॅयलेट्सची उभाणीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार शहरात चौदा ठिकाणी ई-टाॅयलेट्सची उभारणी करण्यात आली. मात्र सध्या यापैकी केवळ तीन टाॅयलेटस सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा… पिंपरी: प्रशासनाचे एक पाऊल मागे; नाट्यगृहांच्या भाड्यात केली कपात

या अत्याधुनिक ई-टाॅयलेट्सचे व्यवस्थापन आणि देखभाल दुरुस्तीचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. करोना संसर्ग कालावधीत या कंपनीबरोबरचा करार संपला आणि त्यानंतर ई-टाॅयलेट्स बंद पडली. ई-टाॅयलेट् सेवेसाठी शुल्क आकारले जात असले तरी टापटीप,सुरक्षितता, अत्याधुनिक सुविधा आदी कारणांमुळे या स्वच्छतागृहांचा वापरही वाढला होता. खासगी कंपनीबरोबरचा करार संपुष्टात आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून करार सुरू करण्यासंदर्भात विलंब करण्यात आला.

हेही वाचा… देशात सर्वाधिक सहकारी संस्थांचे जाळे महाराष्ट्रात… एवढ्या आहेत संस्था

सध्या ही प्रक्रिया करण्यात आली असली तरी केवळ तीन स्वच्छतागृहे सुरू आहेत. अन्य स्वच्छतागृहे बंद असल्याची कबुली महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, या अत्याधुनिक ई-टाॅयलेट्सची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणच्या स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले आहेत. त्यामुळे त्यांचा वापरही होत नसल्याचे चित्र आहे.

Story img Loader