सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अधिसभेच्या पदवीधर गटातील निवडणुकीत नऊ जागा मिळवत भारतीय जनता पक्षानेच वर्चस्व राखले. तर महाविकास आघाडी केवळ एकाच जागेवर विजय मिळवू शकली. यंदा पहिल्यांदाच राजकीय पक्षांनी उघडपणे या निवडणुकीत पॅनेल करून उमेदवार उतरवल्याने या निवडणुकीला राजकीय स्वरुप प्राप्त झाले. त्यात भाजपशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले पॅनेल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेल, हिंदू महासभा आदी पक्ष-संघटनांचे एकूण ३७ उमेदवार १० जागांसाठी रिंगणात १० जागांसाठी  होते.  मंगळवारी रात्री उशीरा मतमोजणी संपली.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे विद्यापीठावर भाजपचेच वर्चस्व; महाविकास आघाडीला एकच जागा

भारतीय जनता पक्षाशी संबंधितांच्या विद्यापीठ विकास मंचाने दहापैकी नऊ जागांवर विजय मिळवला. त्यात खुल्या गटात प्रसेनजित फडणवीस, सागर वैद्य, युवराज नरवडे, दादाभाऊ भिकाजी शिनलकर, अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे, भटक्या जाती प्रवर्गातून विजय सोनवणे, इतर मागास प्रवर्गातून सचिन गोरडे, अनुसूचित जमाती प्रवर्गातूनगणपत नांगरे, तर महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर यांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलच्या बाकेराव बस्ते या एकमेव उमेदवाराने विजय मिळवला. खुल्या प्रवर्गातील दोन जागांसाठी काहीशी चुरस झाल्याचे दिसून आले. मतमोजणीत दहाहून अधिक फेऱ्या झाल्या. 

हेही वाचा >>>पुण्यात रिपब्लिकन गटात अस्वस्थता?

महाविकास आघाडीतील फुटीचा फटका?
राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने या निवडणुकीत वेगळी चूल मांडल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसून आले. काँग्रेसने महाविकास आघाडीत सहभागी न होता छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलला पाठिंबा दिला होता. मात्र या पॅनेलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मतांच्या विभागणीचा महाविकास आघाडीला फटका बसला. 

यंदाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिसभा (सिनेट) निवडणुकीत आमच्या १० पैकी ९ जागांवर विजयी झाला आहे.त्या बद्दल सर्व मतदारांचे विशेष आभार आहे.तसेच येत्या काळात विद्यार्थी वर्गाचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र या निवडणुकीत आम्हाला १ जागेवर पराभव पत्करावा लागला.याबाबत सांगायचे झाल्यास आमच कुठे तरी गणित चुकले. प्रसेनजीत फडणवीस ( विजयी उमेदवार सिनेट सदस्य, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bharatiya janata party won in the savitribai phule university pune adhisabha elections pune print news amy
Show comments