पुण्यातील कोंढवा येथील खडी मशीन भागातील मोकळ्या जागेत शिर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने पोलिसांच्या तपासात अडथळे येत आहेत.
कोंढवा पोलिसांच्या माहितीनुसार, कोंढव्यातील खडी मशीनजवळील एका मोकळ्या जागेत हा मृतदेह आढळून आला असून हा हत्येचा प्रकार आहे. मात्र, संबंधित मृतदेहाचे शिर अद्याप सापडले नसल्याने तो कोणाचा आहे हे कळू शकलेले नाही. दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला.
मात्र, मृतदेहाच्या प्राथमिक तपासणीतून चार दिवसांपूर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस मिळेल त्या सुगाव्यावरुन या हत्याकांडाचा तपास लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.