तरुणीची छेड काढल्याचा आरोप करुन व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील सोनसाखळी, अंगठी, पाच हजार रुपयांची रोकड असा ऐवज लुटण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली.या प्रकरणी श्रवण नावाचा आरोपी तसेच साथीदार आणि एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>लोणावळा : भुशी धरणात बुडून मुंबईतील महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू

तक्रारदार व्यावसायिक कात्रज भागात राहायला आहे. आरोपी श्रवण व्यावसायिकाचा ओळखीचा आहे. आरोपी श्रवण आणि साथीदार व्यावसायिकाच्या घरी आले. तरुणीची छेड काढली असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांकडे तक्रार करतो, अशी धमकी देऊन आरोपींनी व्यावसायिकाकडील सोनसाखळी, अंगठी आणि पाच हजार रुपयांची रोकड असा ऐवज लुटला. घाबरलेल्या व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.