एका कालव्यावरील पुलावरून भरधाव वेगाने जाणारी कार पुलाचा कठडा तोडून थेट कालव्यात कोसळल्याची घटना फुरसुंगी येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एका कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, नितीन निवृत्ती कुंभार (वय ४३, सध्या राहणार भेकराईनगर, मूळगाव सासवड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या कराटे प्रशिक्षकाचे नाव आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास फुरसुंगी येथील सोनार पुलाचा कठडा तोडून त्यांची कार कॅनॉलमध्ये कोसळली, ते स्वतः कार चालवित होते. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पुणे-सोलापूर रोडवरील हडपसरच्या दिशेने येताना मधूबन कार्यालयाच्या बाजूने भेकराईनगरकडे नितीन कुंभार आपल्या सॅन्ट्रो कारमधून मध्यरात्रीच्या सुमारास जात होते. दरम्यान, फुरसुंगी येथील सोनार पुलाचा कठडा तोडून त्यांची कार कॅनॉलमध्ये कोसळली. कुंभार हे लोणी काळभोर येथील एका शाळेमध्ये कराटे प्रशिक्षक म्हणून काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The car break railings and collapsed in the water the karate coach died
Show comments