पुणे : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यात सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटकडील मुख्य प्रशिक्षकांमार्फत (मास्टर ट्रेनर) प्रशिक्षण देण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे दहा हजार प्रगणकांमार्फत बुधवारी सकाळी प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात सॉफ्टवेअर चांगली सुरू होते, मात्र, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राज्यभरात एकाचवेळी संगणकप्रणाली वापरात आल्याने सर्व्हर डाऊन झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वेक्षणाचे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करायचे नियोजन आहे. त्यासाठी ग्रामीण भागात तालुकास्तरावर १५ नोडल अधिकारी, १५ सहायक नोडल अधिकारी, ४६६ पर्यवेक्षक आणि ६५९६ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सुमारे साडेतीन हजार प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी प्रत्यक्षात सर्वेक्षणासाठी प्रगणकांनी काम सुरु केले. मात्र, सर्वेक्षण सुरु होताच दुपारी बारा वाजल्यापासून सर्व्हर डाऊन झाला, मोबाइल ॲपमधील काही ऑप्शन उघडले जात नव्हते. परिणामी सर्वेक्षणाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या. याबाबतची माहिती मागासवर्ग आयोगाला देण्यात आली. त्यानुसार सर्व्हरमध्ये सुधारणा केली जात असल्याचे कळवण्यात आले. मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा मंगळवारी पहिला दिवस होता. एकाचवेळी संगणकप्रणाली वापरात येत असल्याने सर्वेक्षणाचे काम संथगतीने मात्र सुरू होते, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The computer server used for the maratha community survey is down pune print news psg 17 amy