पुणे: हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या ‘पुणेरी मेट्रो’ प्रकल्पाचे काम वेगाने पुढे सरकत आहे. या मार्गावरील खांब उभारणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या २३.३ किलोमीटर मार्गावरील एकूण ९२३ खांबांपैकी ७१५ खांबांची म्हणजेच ८० टक्के उभारणी आता पूर्ण झाली आहे.

गणेशखिंड रस्त्यावर कृषी महाविद्यालय चौकाच्या अलीकडे गुरुवारी या मेट्रोचा ७१५ वा खांब उभा करण्यात आला. विशेष म्हणजे, मागील वर्षी एप्रिल महिन्यात गणेशखिंड रस्त्यावर पहिल्या खांबाचे कास्टिंग केल्यानंतर १७ महिन्यांत ७०० खांब उभारणीचा टप्पा ओलांडण्यात आला आहे.

atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Pune crowded Lakshmi road, Lakshmi road pune,
विश्लेषण : पुण्यातील गजबजलेला लक्ष्मी रस्ता होणार वाहनमुक्त! कर्कश हॉर्न, बेशिस्त पार्किंग, बेदरकार वाहनचालकांना चाप… कसा? कधी?
butibori investment , jsw company battery project,
मुख्यमंत्र्यांच्या शहरात १५ हजार कोटींची गुंतवणूक; तब्बल ४५० एकर जमिनीवर…
india hyperloop track ready
मुंबई-पुणे फक्त २५ मिनिटांत; पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार, याचा भारताला फायदा कसा होणार?
pod taxis , Shiv Railway Station, pod taxis Mumbai,
दुसर्‍या टप्प्यात पाॅड टॅक्सीची शीव रेल्वे स्थानकापर्यंत धाव, १६ स्थानकांचा समावेश
pune PMP is likely to increase ticket rates this year
पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?
Pushpa 2 Advance Bookings
‘पुष्पा २’चा प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच विक्रमी रेकॉर्ड; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये १०० कोटींचा आकडा पार

हेही वाचा… पिंपरी-चिंचवड न्यायालयासाठी बांधली जाणार नवीन इमारत

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन ३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तर्फे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्यासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

‘पाईल कॅप’ उभारणीलाही गती

खांब उभारणीच्या जोडीला पुणे मेट्रो लाईन ३ साठीच्या पाईल कॅपचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले असून ९२३ पैकी ८१० पाईल कॅपची उभारणी पूर्ण झालेली आहे. या मार्गिकेवरील खांब दोन हजार मिमी व्यासाचे आणि मेट्रो रेल्वे यंत्रणेच्या आरेखन मापदंडांशी सुसंगत असे साकारण्यात येत असल्याचे पुणे मेट्रो लाईन ३ चे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी सांगितले.

Story img Loader