पुणे : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) २०२३-२४ च्या हंगामात देशातील कापूस उत्पादन ३०९ लाख गाठींवर गेल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी २९४ लाख गाठींचा अंदाज होता. जागतिक बाजाराच्या तुलनेत देशात मिळणारा दर जास्त असल्यामुळे निर्यातही रोडावली आहे.

सीएआयने आपल्या या पूर्वीच्या अंदाजात देशात २९४ लाख गाठींचे (१७० किलोची एक गाठ) उत्पादन होण्याचा अंदाज होता. आपल्या अंदाजात सुधारणा करून ३०९ लाख गाठींचे उत्पादन झाल्याचे म्हटले आहे. उत्पादनात वाढ झाली असली तरीही जगभरात असलेले मंदीचे वातावरण, इस्रायल-हमास युद्धामुळे सुएझ कालव्यातून बंद असलेली वाहतूक, रशिया-युक्रेनमधील तणाव आणि जागतिक बाजाराच्या तुलनेत देशात मिळत असलेला चांगला दर या कारणांमुळे देशातून होणारी निर्यात रोडावली आहे. २०११ च्या सुमारास देशातून सुमारे ७० ते ८० लाख गाठींची निर्यात होत होती. मागील काही वर्षांत ही निर्यात ४२ लाख गाठींवर आली आहे. यंदा जेमतेम २० लाख गाठींची निर्यात होण्याचा अंदाज आहे.

Rabi season sowing is nearing completion with 632 27 lakh hectares sown by January 14
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड जाणून घ्या, देशातील रब्बी पेरण्यांची स्थिती, लागवड क्षेत्र
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Over 2400 people died in extreme weather events like floods heatwaves and landslides
हवामान प्रकोपाचे गतवर्षांत देशात २४०० बळी, जाणून घ्या, उष्णतेच्या झळांची स्थिती काय
Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
Kerala Crime
Kerala Horror : धक्कादायक! दलित तरुणीवर ५ वर्षांत ६२ जणांकडून बलात्कार; पोलि‍सांनी आतापर्यंत ४४ जणांच्या आवळल्या मुसक्या
Kolkata is India’s most congested city in 2024
India’s Most Congested City in 2024 : सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत पुणे तिसऱ्या स्थानावर; मुंबईचं स्थान कितवं? नवं सर्वेक्षण काय सांगतं?
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
coconut prices increased loksatta news
बदलत्या हवामानामुळे नारळ उत्पादन घटले, श्रीफळ (नारळ) महागले

हेही वाचा >>>पुणे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर रविंद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया

कापूस उद्योगाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूस उत्पादनात वाढ होण्याच्या अंदाजामुळे देशातील कापूस दरात काहीशी घट झाली आहे. मागील आठवड्यात प्रति क्विंटल दर सरासरी साडेसात ते आठ हजार रुपयांवर गेले होते. त्यात काहीशी घट झाली आहे. पण, कापूस उत्पादनात वाढ झाली तरीही दुसरीकडे देशांतर्गत वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे कापसाचे दर सरासरी आठ हजार क्विंटलवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. सीआयएने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीअखेर १५ लाख गाठींची निर्यात झाली होती, ती आता २० ते २२ लाख गाठींवर जाण्याचा अंदाज आहे.

उत्पादन वाढले, दर्जा घसरला

देशभरात कापसाचे उत्पादन वाढले तरीही मोसमी पावसातील खंडामुळे कापसाचा दर्जा घसरला आहे. कर्नाटक आणि विदर्भातील कापसापासून तयार केलेल्या धाग्याची ताण सहन करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे सूतगिरण्यांकडून कापसाला मागणी घटली आहे. त्या तुलनेत मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली येथील कापसाचा दर्जा चांगला आहे. पण, शेतकरी मागील हंगामातील शिल्लक कापूस आणि या हंगामातील कापूस मिसळून विक्री करीत आहेत. त्यामुळे धाग्यांचा दर्जा घटत आहे, अशी माहिती राज्य सहकारी वस्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी दिली.

Story img Loader