लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणास न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी सुनावली. दंडाची रक्कम पीडीत मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

याबाबत १५ वर्षीय मुलीच्या वडिलांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. शिक्षा झालेला आरोपी पीडित मुलीच्या नात्यातील आहे. कामानिमित्त तो तिच्या घरी मुक्कामी यायचा. त्याने मुलीवर अत्याचार केले. मुलीची आई आजारी होती, तसेच ती अपंग असल्याने तिने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली नव्हती.

हेही वाचा… पुणे : व्यापाऱ्यावर गोळीबार; बंगळुरूमध्ये दोघे अटकेत

खटल्याची सुनावणी सुरू असताना मुलीने फितूर होण्याचा प्रयत्न केला होता. सरतपासणीमध्ये तिने तिच्यावर झालेला अत्याचार न्यायालयास सांगितला. मात्र, उलट तपासणीमध्ये तिने तिचे वय जास्त आहे, आरोपीचे नाव चुकीचे आहे, असे न्यायालयात सांगितले. मुलीने ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले होते. आरोपीला टोपण नाव असू शकते. तसेच मुलीचे वय १६ पेक्षा कमी असल्याचे न्यायालयात दाखल असलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे, असा युक्तीवाद सरकारी वकील मारुती ॲड. वाडेकर यांनी केला.

हेही वाचा… पिंपरीत भाजपाच्या ‘या’ दाव्याने महायुतीत बिघाडी?

ॲड. वाडेकर यांना सरकारी वकील ॲड. संध्या काळे आणि ॲड. अरुंधती ब्रम्हे यांनी सहाय केले. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. पी. कुलथे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असे निकालात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader