लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विराेधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे मेथामाफेटामीन या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चारजणांना जेरबंद करण्यात आले आहे. सातारा ते लाेणावळा यादरम्यान आराेपींचा पाठलाग करुन कस्टम पथकाने पाच काेटी रुपये किंमतीचे एक किलाे मेथामाफेटामीन अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती कस्टम विभागाने बुधवारी दिली.
पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ पथकास सातारा येथून मुंबईला माेठया प्रमाणात मेथामाफेटामीन या अंमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार कस्टम पथकाने सातारा येथून आराेपींच्या काळया रंगाच्या फाेर्ड एन्डेव्हर या गाडीचा पाठलाग केला.
हेही वाचा… पुणे: गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं पडलं महागात; तिघांवर गुन्हा दाखल
खेड शिवापूर टाेलनाका येथे गाडी आली असताना, कस्टम पथकाने संबंधित गाडी पकडली. त्यावेळी गाडीत दाेघेजण हाेते, त्यांच्या ताब्यातून सुरुवातीला ८५० ग्रॅम मेथामाफेटामीन मिळून आले. परंतु त्यांचे आणखी दाेन साथीदार लाेणावळयात त्यांना भेटणार असून त्यांच्याकडेही अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कस्टमच्या पथकाने लाेणावळ्यात आणखी दाेघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडूनही २०० ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले.