राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारमधील एक मंत्री तानाजी सावंत यांना लक्ष्य करत खोचक ट्वीट केलं आहे. याशिवाय, अमोल मिटकरींनी तानाजी सावंत यांच्या २६ ऑगस्ट २०२२ रोजीच्या दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका शेअर केली असून, ही कार्यक्रम पत्रिका आता व्हायरल होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना तानाजी सावंत यांनी इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे पोलिस आयुक्त कार्यालय येथे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची शहरातील वाहतूक आणि अन्य प्रश्नाबाबत कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार मंत्री चंद्रकांत पाटील आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांच्याशी संवाद साधला.

अमोल मिटकरींनी ट्वीटद्वारे केली आहे टीका –

मिटकरींनी या दौऱ्याच्या नियोजन पत्राचा फोटो शेअर करत खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “हे आहेत आमचे आरोग्यमंत्री! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम!! काय ते मंत्री? काय त्यांचं नाव? आणि काय त्यांचा दौरा? एकदम ओक्के ओक्के”, असं आपल्या ट्वीटमध्ये मिटकरींनी नमूद केलं आहे.

काय म्हणाले तानाजी सावंत ? –

यावर तानाजी सावंत म्हणाले, “मी शासकीय वाहनं वापरण्याच्या विरोधातच आहे. माझ्या स्वत:च्या गाड्या आहेत. मी शासनावर ताण येऊ नये म्हणून सुरक्षा देखील टाळतो आहे. आता संरक्षणाची गरज जनतेला आहे, काही दिवसांवर गणपती आलेले आहेत. कायदा-सुव्यवस्था नीट रहावी यासाठी सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे, त्यासाठी आता चर्चा केली आहे. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता आता पुण्यात आहे.”

“काय ते मंत्री..काय त्यांचे नाव..काय त्यांचा…”, अमोल मिटकरींचं खोचक ट्वीट, तानाजी सावंतांना टोला!

तसेच, “ते मला ट्रोल करत आहेत. हा त्यांचा मागील दहा-पंधरा दिवसांचा कार्यक्रम आहे. पण माझ्या वरिष्ठांनी मला काही सूचना केल्या आहेत. की तुम्ही बोलू नका, त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या त्यांच्या बोलण्यावर व्यक्त व्हायचं नाही. पण ज्या दिवशी मी व्यक्त होईल त्यावेळी मात्र पुन्हा आठ दिवस हंगामा माजलेला असेल.”, असं म्हणत तानाजी सावंत यांनी इशारा दिला.