पुणे : यंदा मोसमी पावसाचा अंदाज पाहता धरणातील पाणीबचत करणे आवश्यक आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा प्रस्ताव महापालिकेकडून सादर करण्यात आला होता. मात्र, शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढच्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत होतो. परिणामी पाणी वितरणातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महानगरपालिकेने आठ दिवसांत उपाययोजना सादर कराव्यात. तोवर शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही, असा निर्णय बुधवारी घेण्यात आला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
News About Rahul Narwerkar
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरणार? राजकीय वर्तुळात चर्चा काय?
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
Waqf Amendment Bill to be tabled in February 2025 budget session
‘वक्फ’मध्ये महत्त्वाचे बदल नाहीच? मूळ विधेयक लोकसभेत संमत होण्याची शक्यता
CM Devendra Fadnavis IMP Statement About Ladki Bahin Scheme
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य, “२१०० रुपये…”

हेही वाचा… “अकबर हिंदू होता, ताजमहाल बांधणाऱ्याची आई…”, भालचंद्र नेमाडेंचं मोठं विधान

हवामान विभागाचा यंदाचा अंदाज पाहता पाणीटंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. धरणातील उपलब्ध पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे. शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. मात्र, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो, अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी बैठकीत केली. त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… पिंपरी : साखरपुड्यानंतर तरुणीवर अत्याचार, पाच लाखांची फसवणूक आणि लग्नास नकार

दरम्यान, खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्यातून ग्रामीण भागासाठी दुसरे उन्हाळी आवर्तन १ मेपासून सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चार धरणांत ११.६१ अब्ज घनफूट ( टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यानुसार दुसऱ्या उन्हाळी आवर्तनात साडेचार ते पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, तर शहरासाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

Story img Loader