पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशांसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी ३१ डिसेंबर २०२४पर्यंत किमान तीन वर्षे, तर कमाल चार वर्ष पाच महिने, तर पहिलीसाठी सात वर्ष पाच महिने अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

खेळगट, बालवाडी, पहिली अशा विविध स्तरावर विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात. मात्र प्रवेशासाठीच्या वयनिश्चितीबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने या पूर्वी ‘आरटीई’ प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये शाळेत प्रवेश घेण्यासाठी बालकांचे किमान वय किती असावे, हे यापूर्वीच निश्चित केले आहे. मात्र आता किमान आणि कमाल अशी दोन्ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५च्या आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२४ रोजी किती असावी, हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांचा प्राधिकरण परतावा प्रश्न अखेर सुटला! कॅबिनेट मिटिंगमध्ये निर्णय; आणखी एक प्रलंबित प्रश्न निकालात

आता खेळगटासाठी किमान वय तीन वर्षे पूर्ण आणि ३१ डिसेंबर २०२४पर्यंत चार वर्ष पाच महिने पूर्ण अशी कमाल मर्यादा असणार आहे. तर पहिलीसाठी किमान सहा वर्षे पूर्ण आणि कमाल सात वर्ष पाच महिने अशी वयोमर्यादा असेल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.