पुणे : जिल्ह्यात सर्वात कमी मतदारसंख्या असलेल्या कसबा मतदारसंघात सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कमी म्हणजेच ५१ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी रविवारी (२६ फेब्रुवारी) प्रत्यक्ष मतदान होणार असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वीप मोहिमेंतर्गत शुक्रवारी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्यावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मतदारसंघातील विविध ठिकाणी भेट देऊन अधिकाधिक मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.

मतदार यादीतील नाव शोधण्यापासून ते मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. सुटीच्या दिवशी मतदान असल्याने जास्तीतजास्त मतदारांनी आणि नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी केले. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांत पुणे कॅन्टोन्मेंटनंतर सर्वात कमी दोन लाख ७५ हजार ४२८ मतदारसंख्या असलेल्या कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. सुशिक्षित मतदार अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानाचा टक्का वाढत नसल्याचे गेल्या काही निवडणुकांत दिसून आले आहे.

Solapur District Assembly Elections Shiv Sena Thackeray Group Constituency Candidates
सोलापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची कोंडी; जागा वाटपात मतदारसंघ, उमेदवारांचीही वाणवा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Who is Iltija Mehbooba Mufti Bijbehara constituency Jammu and Kashmir
Iltija Mufti : आईच्या जागेवरून आता लेक उभी राहणार; परदेशातील भारतीय संस्थांचा अनुभव असलेल्या इल्तिजा राखणार का मेहबुबा मुफ्ती यांचा गड?
pakistan security 1
नंदनवनातील निवडणूक: पाकिस्तानप्रेमी ‘जमात’ आता निवडणुकीच्या रिंगणात
Buldhana Assembly Election
बुलढाणा: युतीत आलबेल, आघाडीत रस्सीखेच; विधानसभा निवडणुकीसाठी…
state government gave funds for construction of drainage boundary wall pune
पुणे : निधी फक्त भाजप आमदारांनाच, अजित दादांच्या आमदारांना ठेंगा; महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता
Gadchiroli 10 Doctors Prepare to Contest in Assembly Elections
गडचिरोलीत दहा डॉक्टरांना आमदारकीचे वेध
Rebellion in the Mahavikas Aghadi in Junnar Constituency of the District in the upcoming Assembly Elections 2024 pune news
जुन्नरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी? ‘सांगली पॅटर्न’ राबविण्याचे विश्वजीत कदम यांचे संकेत

हेही वाचा >>> पुणे : कसबा, चिंचवडमध्ये छुप्या प्रचारावर प्रशासनाचा ‘वाॅच’

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान वाढावे यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक मोहिमा राबविण्यात आल्या असून प्रथमच ८० वर्षांपुढील आणि शारीरिक विकलांग मतदारांसाठी टपाली मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतदारसंघात २७० मतदान केंद्रे असून सर्व केंद्रे तळमजल्यावर करण्यात आली आहेत. मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून वंचित घटकांसाठी खास मतदार जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांच्या फेरी, कार्यशाळा, चर्चासत्र, प्रश्नमंजुषा, प्रात्यक्षिके, रांगोळी-चित्रकला-फलक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तसेच मतदार यादीत सहज नाव शोधण्यासाठी केवायसी (नो युवर कॅन्डीडेट) हे उपयोजन तयार करण्यात आले आहे.