महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार पाचवीचे २३.९० टक्के विद्यार्थी, तर आठवीचे १२.५३ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.राज्य परीक्षा परिषदेने ३१ जुलै २०२२ रोजी झालेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला होता.
हेही वाचा >>>पुणे स्टेशन परिसरात दोघांकडून १६ लाखांचे चरस जप्त ; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
त्यावरील आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला. पाचवीची परीक्षा तीन लाख ८२ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी ९१ हजार ४७० विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा दोन लाख ७९ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी ३५ हजार ३४ विद्यार्थी पात्र झाल्याची माहिती परीक्षा परिषदेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉग इनमधून; तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. http://www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून दिल्या आला आहे.