पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्ग व चिंचवडगावास जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे आयुर्मान संपल्याने रेल्वे विभागाच्या सूचनेनुसार हा पूल पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नवीन पुलाच्या उभारणीसाठी सल्लागार नियुक्तीस आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चिंचवड येथील रेल्वेवरील वाहतुकीसाठी दोन समांतर रेल्वे उड्डाणपूल अस्तित्वात आहेत. त्यापैकी चिंचवड स्टेशनवरुन चिंचवड गावाकडे जाताना उजव्या बाजुकडील पूल नवीन आहे. तसेच, डाव्या बाजुकडील पूल हा जुना आहे. जुन्या पुलाचे आयुर्मान संपत आले असल्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने या पुलाची पाहणी करण्यात आली होती. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट तज्ज्ञ संस्थेकडून करून घेण्यात आले होते. या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल महानगरपालिकेने आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरींग यांच्यामार्फत त्रयस्थपणे छाननी करून घेतला होता. त्यातच भारतीय रेल्वे विभागाने देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेला संबंधित पुलाच्या स्लॅबवरील डेड लोड कमी करण्याबाबत पत्र पाठवले होते.
हेही वाचा >>>मुंबईतील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक
दरम्यानच्या काळात पुलाच्या केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटचे सादरीकरण महापालिका आयुक्त यांच्यासमोर करण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार स्ट्रक्चरल ऑडिट अहवालाबाबत निष्कर्ष काढणे, आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेचे शहर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीची बैठकीत स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल व रेल्वे विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार काही उपाययोजना सूचवल्या होत्या. त्यानुसार महानगरपालिकेने पुलाच्या स्लॅबवरील डेड लोड कमी केला. तसेच जुन्या पुलाची स्थिती पाहता तो अवजड वाहतूक, बस यांच्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. या पुलावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणार नवीन पूल
जुन्या पुलावरून बस वाहतूक बंद असल्यामुळे चिंचवडकडे जाणाऱ्या बसेस आणि अवजड वाहने दळवी नगरमार्गे वळसा घेऊन जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी जुन्या पुलावरून अवजड वाहतूक सुरू करण्यात यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून महापालिकेकडे करण्यात येत होती. या मागणीस अनुसरून महापालिका आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सदर पुलावरून जड वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टिने रेल्वे विभागाशी सल्लामसलत करुन नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधणेसाठी तत्वतः मान्यता देण्यात आली. रेल्वे विभागाने देखील सदर पुलाबाबत महानगरपालिकेस अभिप्राय सादर केला होता. या अभिप्रायामध्ये रेल्वे विभागाने सदरचा पूल जीर्ण झाला असल्याने व सुरक्षिततेच्या दृष्टिने महानगरपालिकेने नवीन पूल बांधवा, असे सुचीत केले होते. अखेर समितीचा अहवाल, रेल्वे विभागाचा पूल नवीन बांधण्याचा अहवाल, लोकप्रतिनिधी यांची पुलावरील जड वाहतुक चालू करण्याची मागणी या सर्व बाबींचा विचार करता हा जुना पूल पाडुन तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी स्थायी व सर्वसाधारण सभेत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नविन पुल बांधणे व पुलाचे कामासाठी सल्लागार नेमण्याचे कामास मंजुरी दिली आहे.
हेही वाचा >>>राज्यात बुलेट ट्रेनच्या कामाला वेग; मुंबईतील भूमिगत स्थानकाचा पहिला बेस स्लॅब पूर्ण
पाच ते दहा वर्ष वाढले पिंपरी पुलाचे आयुर्मान
पिंपरी येथील उड्डाणपुलाचे रेल्वेच्या सल्ल्यानुसार स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. सदर काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. हे काम झाल्यामुळे पुलाचे आयुर्मान देखील ५ ते १० वर्षांनी वाढले आहे. आता या पुलाबाबत भविष्यात पाच वर्षानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करून रेल्वे विभागाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी येथील पूल पाडण्याची सूचना किंवा लेखी पत्र रेल्वे विभागाकडून प्राप्त झालेले नाही.
सल्लागारा मार्फत अंदाजपत्रक तयार करून रेल्वेच्या खात्याच्या मान्यतेनंतर निविदा कार्यवाही पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर कामाला सुरुवात होईल. कामासाठी आवश्यक आर्थिक तरतुद करण्यात येत असल्याचे स्थापत्य प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर यांनी सांगितले. तर, रेल्वे विभागाच्या सूचनेनुसार चिंचवड येथील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. पुढील कार्यवाही लवकरच केली जाईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.