पुणे: तेलंगणातून शहरात विक्रीस पाठविण्यात आलेला गुटखा वाहतूक करणारा ट्रक अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पकडला. या कारवाईत एफडीएच्या पथकाने गुटखा, तसेच ट्रक असा ४७ लाख २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याबाबत एफडीएच्या अधिकारी शुभांगी जितेंद्र कर्णे (वय ३८) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी राजकुमार शामू यादव (वय ३२, रा. हैद्राबाद, तेलंगणा) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार कृष्णा यादव (रा. तेलंगणा), शिल्डी कृष्णा रेड्डी (रा. कांदिवली. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… पिंपरी: पादचाऱ्यांसाठी ‘हरित सेतू’

पाषाण परिसरातून एक ट्रक मुंबईकडे निघाला असून ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची माहिती एफडीएच्या पथकाला मिळाली होती. पाषाण परिसरातील सेवा रस्त्यावर असलेल्या एका ढाब्याच्या परिसरात एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ट्रक थांबविली. ट्रकची तपासणी केली. तेव्हा ट्रकमध्ये गुटख्याची पाकिटे आढळून आली. एफडीएच्या पथकाने गुटख्याची १४ हजार ३१० पाकिटे जप्त केली. ट्रकचालक यादवला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय चौगुले तपास करत आहेत.