पुणे : दहावी आणि बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळून त्यांना उत्तीर्ण असल्याची बनावट प्रमाणपत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल आणि हिंद युनिर्व्हसिटी नावाने बनावट संकेतस्थळ सुरू केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे.

या प्रकरणी कृष्णा सोनाजी गिरी, सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर), अल्ताफ शेख (रा. परांडा, जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दहावी आणि बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन बनावट प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी तोतया विद्यार्थ्याच्या माध्यमातून संदीप ज्ञानदेव कांबळे (रा. सांगली) याच्याशी संपर्क केला. कांबळे याने दहावीच्या प्रमाणपत्रासाठी साठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्यानंतर पहिला हप्ता म्हणून कांबळेला ३९ हजार रुपये देण्यात आले. उर्वरित  रक्कम घेण्यासाठी कांबळेला पुण्यात बोलाविण्यात आले. स्वारगेट भागात त्याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत प्रमाणपत्र देण्यासाठी अनेक ठिकाणी मध्यस्थ (एजंट) नेमल्याची माहिती मिळाली.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले

बनावट प्रमाणपत्रासाठी ३५ ते ५०  हजार रुपये

ज्या विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्र तातडीने हवे आहे, अशा विद्यार्थ्यांशी कांबळे आणि मध्यस्थ संपर्क साधत होते. त्यांच्याकडून पैसे घेऊन प्रमाणपत्र दिले जात होते. त्यासाठी ३५ हजार ते ५० हजार रुपये घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नोकरी मिळवणे तसेच शासकीय कामासाठी दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने अनेकांना या टोळीने गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.