पुणे : शहरात कोयते उगारुन दहशत माजविण्याचे सत्र सुरू असतानाच वारजे भागात टोळक्याने चार वाहने पेटवून दिल्याची घटना घडली. टोळक्याने एका मोटारीची काच फोडली.
या प्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वारजे भागातील रामनगर परिसरात रिक्षा, तसेच तीन दुचाकी लावण्यात आल्या होत्या. मध्यरात्री टोळक्याने तरुणाच्या घरासमोर लावलेल्या तीन दुचाकी, तसेच सचिन तिडके यांची रिक्षा पेटवून दिली. या भागातील रहिवासी प्रवीण घोलप यांच्या मोटारीची काच फोडून टोळके पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.