सारसबाग परिसरात युवतीचा मोबाइल संच चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.याबाबत एका युवतीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती आणि तिची आई सारसबाग परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन घेऊन झाल्यानंतर युवती मोबाइलवर मंदिराबाहेर आईचे छायाचित्र काढत होती.
हेही वाचा >>>पुणे: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उद्या २७०० पोलीस तैनात; गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर
त्या वेळी चोरट्यांनी युवतीच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचाऱ्यांचे मोबाइल संच हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.