मनसेच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी एमएनएस अधिकृत या ट्विटर हँडलवर वाढदिवसानिमित्त एक पोस्ट केली आहे. वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसावर होणार खर्च मी जुना बाजार होर्डिंग दुर्घटनेत अनाथ झालेल्या शिवाजी परदेशी यांच्या मुलांना झाशीची राणी प्रतिष्ठान तर्फे मदत म्हणून देणार आहे. आपण माझ्यासाठी पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि केक न आणता ती रक्कम शुभेच्छा देणगी म्हणून आणावी आणि चिमुकल्यांना मदत करावी अशी विनंती मी करते असेही आवाहन रुपाली पाटील यांनी केलं आहे.

पुण्यातील जुना बाजार चौकात शुक्रवारी होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेत नाना पेठ भागात राहणारे रिक्षा चालक शिवाजी परदेशी यांचाही मृत्यू झाला. गुरुवारी शिवाजी यांच्या पत्नीचे निधन झाले . त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवाजी यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी आणि मुलगा यांच्या डोक्यावरून आई वडिलांचे छत्र हरवले. आता याच दोघांना म्हणजेच समृद्धी आणि देवांशुला आपण आर्थिक मदत करणार असल्याचे रुपाली पाटील यांनी जाहीर केले आहे.