पुणे : जुना वटवृक्ष उन्मळून पडल्याची घटना गुरुवारी रात्री रास्ता पेठ परिसरात घडली. पॉवर हाऊस समोर असलेले वडाचे झाड पडून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी सागर-पाच जणांना मुका मार लागला आहे. त्यांना केइएम रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले आहे. वडाचे झाड पडल्याने रास्ता पेठ परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग्निशमन दल, महापालिका उद्यान विभाग तसेच महावितरण कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले असून शुक्रवारी (२८ जुलै) सकाळपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल.