लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पिंपरी: आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांचे यथायोग्य स्मारक महाराष्ट्रात नव्हते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या नाट्यगृहाच्या रूपाने राज्यातील पहिले स्मारक उभे राहत असून, गदिमांवरील अन्याय काही अंशी दूर झाला असल्याची भावना गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी व्यक्त केली.
पिंपरी महापालिकेच्या वतीने निगडी प्राधिकरणात उभारण्यात आलेल्या गदिमा नाट्यगृहाला सुमित्र माडगूळकर यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या नाट्यगृहाविषयीच्या भावना त्यांनी समाजमाध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा- पुणे: खराडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला पकडले
माडगूळकर म्हणाले, की अत्याधुनिक नाट्यगृहाच्या माध्यमातून पिंपरी महापालिकेने देखणी वास्तू साकारली आहे. ८५० आसनांचे मुख्य नाट्यगृह, २५० आसनांचे छोटेखानी नाट्यगृह, कलाकारांसाठी १४ खोल्या, कलादालन, मिनी थिएटर, रंगीत तालमीसाठी सभागृह, कॅफेटेरिया, दर्जेदार खोल्या, ग्रीन रूम, ४५० चारचाकी व २५० दुचाकींसाठी प्रशस्त दुमजली वाहनतळ, अपंगांसाठी विशेष सुविधा, वातानुकूलन यंत्रणा, आरामदायी अत्याधुनिक खुर्च्या बसविल्या आहेत. नाट्यगृह पाहिल्यानंतर सुंदर परदेशी ऑपेरा हॉलची प्रचिती येत आहे. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, अभिनेते प्रशांत दामले, संगीतकार अवधूत गुप्ते अशा नामवंत कलाकारांच्या सल्ल्याने ध्वनियंत्रणा केली आहे. नाट्यगृहाच्या रूपाने गदिमांचे महाराष्ट्रातील पहिले स्मारक उभारण्याचा मान पिंपरी-चिंचवडने मिळवला. या नाट्यगृहासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार.