जिल्हा परिषदेची पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल ही निवासी शाळा अनुभवी शिक्षण संस्थेला सात वर्षांसाठी चालविण्यास देण्यात येणार आहे. शासनाची मान्यता मिळण्यासाठी जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी ; पैशांची परतफेड करुनही १५ लाख खंडणीची मागणी

जिल्हा परिषदेकडून कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व निधीमधून (सीएसआर फंड) खानवडी येथे १२ एकर जागेत शाळेचे टप्प्याटप्प्याने बांधकाम करण्यात येत आहे. अंदाजे २६ कोटी रुपये खर्च शाळा उभारणीसाठी येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण विकास विभागाच्या सचिवांना दिलेल्या पत्रात जिल्हा परिषदेला किंवा शासनाला शाळा चालविण्यासाठी कोणताही निधी द्यावा लागणार नाही किंवा शासनावर आर्थिक भार पडणार नाही. शाळा चालविण्यास देण्यासाठी संबंधित संस्थेशी करार करून त्यांना त्यांची जबाबदारी दिली जाणार आहे. शाळेचे सर्व अधिकार जिल्हा परिषदेकडेच राहणार आहेत, असे नमूद केले आहे.

हेही वाचा >>>महामार्ग, सेवा रस्त्यांवर राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला वेग ; गस्त पथकाकडून दोन महिन्यांत ९४ खटले दाखल

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल ही शाळा अनुभवी शिक्षण संस्थेला सात वर्षांसाठी चालविण्यास देण्यासाठी शिक्षण मान्यता दिली आहे. खासगी शिक्षण संस्थेस शाळा चालविण्यास देताना संबंधित संस्थेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग संस्थेचा राहणार असून संबंधित संस्थेने केवळ मनुष्यबळ पुरविणे आवश्यक आहे. या संस्थेमार्फत शाळा व इतर उपक्रम चालविण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी संबंधित संस्था सीएसआर निधीतून उभा करणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The international school at khanwadi will be managed by a private educational institution pune print news amy