पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या इराणी टोळीने हैदोस घातला होता. अखेर या टोळीच्या मोरक्याला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपीकडून साठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सराईत सोनसाखळी चोरटा मुसा अन्नू सय्यद उर्फ इराणी याला पोलिसांनी अटक केली असून इतर तीन आरोपींचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी या उच्चभ्रू परिसरामध्ये मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून इराणी टोळी पसार व्हायची. या टोळीने एकाच दिवशी दोन ठिकाणी सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे सांगवी पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. अखेर यातील मुख्य आरोपी इराणी टोळीचा म्होरक्या मुसा अन्नू सय्यद उर्फ इराणी याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत

हेही वाचा – महसूल आणि भूमी अभिलेख विभागांचा मोठा निर्णय ; आता महानगरांलगतच्या जमिनी खरेदी-विक्रीतील गैरप्रकारांना बसणार चाप

हेही वाचा – Video : गोष्ट पुण्याची – १११ : महाराष्ट्रातील नागदेवतेचे दुर्मिळ मंदिर, पुण्यातील दगडी नागोबा!

आरोपीकडून ६० हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी इराणीला अहमदनगर तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. अहमदनगरच्या सब जेलमधून आरोपीला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे. इराणीचे साथीदार अब्बास सल्लू इराणी, कासिम अफसर सय्यद आणि अज्जू प्रशांत काटकर यांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.