पूजा साहित्याची विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिलेकडील ९५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या रविवार पेठेतील फडके हौद चौकात ही घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे: नारायण पेठेतील गोदाम फोडून चोरल्या शाम्पू, अत्तरच्या बाटल्या

दिवाळीनिमित्त ज्येष्ठ महिलेने फडके हौद चौक परिसरात रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या स्वरुपात दुकान थाटले आहे. खरेदीच्या बहाण्याने दाेन चोरटे तेथे आले. महिलेला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी ९५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरले. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत.

हेही वाचा- पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; एकास अटक

दिवाळीच्या सणामुळे बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. याचाच फायदा घेऊन अनेक ठिकाणी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत फिरताना आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. तसेच अनोळखी व्यक्ती थांबल्यास किंवा विचारणा केल्यास सुरक्षित अंतर ठेवा. अशा अनोळखी व्यक्तीसोबत अजिबात बोलू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mangalsutra of an elderly lady selling puja materials was stolen pune print news dpj