पिंपरी: महापालिकेच्या विविध विभागातील ३८८ जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र दिल्यानंतर रुजू हाेण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे महापालिकेचे मनुष्यबळ वाढणार असून कामकाज अधिक गतिमान हाेण्यास मदत मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये वर्ग एक ते वर्ग चार मध्ये साडेसात हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, हे मनुष्यबळ कमी पडत असल्याने महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी कर्मचारी माेठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. राज्य शासनाने नोकर भरतीवरील निर्बंध उठवल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १५ पदांच्या ३८८ जागांसाठी मे २०२३ मध्ये तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेतली. यामध्ये ५५ हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर ऑगस्टमध्ये उमेदवारांचा निकाल जाहीर झाला. पात्र सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची २९ नोव्हेंबरला बैठक झाली. या बैठकीत पात्र उमेदवारांची नावे अंतिम करून यादी प्रसिद्ध केली होती.

हेही वाचा… ‘ससून’चे लाखो रुपये बुडाले! रुग्णालय प्रशासनाने घेतली पोलिसांकडे धाव

अतिरिक्त कायदा सल्लागार, विधि अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अँनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा विविध पदांवर महापालिकेला या भरतीनंतर मनुष्यबळ मिळणार आहे.

नाेकर भरतीमधील सर्व पात्र उमेदवारांना महापालिकेत रुजू हाेण्यासाठी शुक्रवारी निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना रुजू हाेण्यासाठी कार्यालयीन कामकाजाचे १५ दिवस मुदत देण्यात आली आहे. साेमवारपासून उमेदवार रुजू हाेण्यास सुरूवात झाली आहे. साेमवारी एकाच दिवशी २१ जण महापालिका सेवेत रुजू झाल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जाेशी यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The manpower in the municipal corporation will increase appointment letters for eligible candidates in servant recruitment pimpri pune print news ggy 03 dvr