महापालिकेच्या वरिष्ठ विद्युत अभियंत्याकडून उद्घाटन
उदयोन्मुख कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडकरांना विविध कलाकारांच्या कला पाहता याव्यात या उद्देशाने चिंचवडमध्ये पु. ना. गाडगीळ आणि सन्सने चापेकर चौकाजवळील दुकानात सुरू केलेली आर्ट गॅलरी हा स्तुत्य उप्रकम आहे, असे प्रतिपादन नगरसेवक नीलेश बारणे यांनी केले.पिपरी-चिंचवड महापालिकेचे वरिष्ठ विद्युत अभियंता प्रवीण तुपे यांच्या हस्ते या कला दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
चित्रकार विद्याधर खरे यांनी काढलेल्या ‘क्रिएटिव्ह लाईफ साईझ’ चित्रांचे प्रदर्शन पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे आर्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत चिंचवडमधील चापेकर चौकाजवळील गोखले वृंदावनमधील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या दुकानात भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन २९ मे पर्यंत सकाळी अकरा ते रात्री साडेसात या वेळेत सर्वासाठी नि:शुल्क खुले आहे. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध विषयांवरील चित्रे ही ‘क्रिएटिव्ह लाईफ साईझ’ या प्रकारातील आहेत. या वेळी पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे सीईओ अमित मोडक, विपणन प्रमुख नंदू देवळे, वरिष्ठ व्यवस्थापक समीर परांजपे आदींची उपस्थिती होती.
मोडक म्हणाले, की कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कलेशी निगडित उपक्रम सुरू केला आहे. तुपे म्हणाले,की आर्ट गॅलरीचा फायदा पिपरी-चिंचवडमधील कलाप्रेमींबरोबरच कलाकारांनादेखील होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा