पुणे : राज्यातील लाखो पालक आरटीई प्रवेशासाठी निवडयादीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र या संदर्भातील न्यायालयीन प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार असून, आरटीई प्रवेशाच्या निवडयादीसाठी पालकांना आणखी वाट पहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील ९ हजार २१७ शाळांतील १ लाख ५ हजार ३९९ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात २ लाख ४२ हजार ९७२ अर्ज दाखल झाले आहेत. जागांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने शिक्षण विभागाने सोडत काढली. अनेक शाळांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याने आता २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने आरटीई कायद्यात केलेला बदल, झालेल्या प्रवेशांना संरक्षण या बाबत खासगी शाळा, संघटनांकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचिकाकर्ते शरद जावडेकर म्हणाले, की आरटीई २५ टक्के आरक्षणाच्या संदर्भात ९ फेब्रुवारी २०२४ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राजपत्राद्वारे अधिसूचना काढून प्रवेश प्रक्रियेत बदल केला होता. या बदलास अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा आणि मूव्हमेंट फॉर पीस जस्टीस फॉर सोशल वेल्फेअर यांनी अनुक्रमे जनहित याचिका, रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरी ६ मे रोजीच्या सुनावणीत शिक्षण विभागाने केलेल्या बदलास न्यायालयाने स्थगिती दिली. कल्याण सिटीझन्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई, असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल्स, मुंबई व श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटी, पिंपरी चिंचवड यांनी हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या सर्व याचिकांवर एकत्रित १८ जून रोजी सुनावणी झाली. न्यायालयाने हस्तक्षेप याचिका दाखल करून घेत तीनही संस्थाना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसाची मुदत दिली. तसेच या संस्थांच्या प्रतिपादनावर जनहित याचिकाककर्ते, शासनाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नंतरचे दहा दिवस देण्यात आले आहेत. पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. परिणामी, आरटीई प्रवेश लांबणीवर पडणार आहेत

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The next hearing of the court case regarding the selection list for rte admission will be held in july pune print news ccp 14 amy
Show comments