पिंपरी : दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पिंपरीतील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाला टाळे लागले आहे. कार्यालयाचे भाडे कोण देणार? त्याची जबाबदारी कोण घेणार? यावरून पदाधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखविले. परिणामी, दोन वर्षांतच कार्यालय बंद करण्याची नामुष्की ओढावल्याचे सूत्रांनी सांगितले.

मागील पंचवार्षिकमध्ये मनसेचा महापालिकेत एकमेव नगरसेवक होता. निगडीतून निवडून आलेले सचिन चिखले शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या पुढाकाराने महापालिका इमारतीसमोरील व्यापारी संकुलात मनसेचे सुसज्ज असे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते दि. १० मार्च २०२२ रोजी झाले होते. महापालिका निवडणूक नियोजित वेळेत होईल हे गृहित धरून कार्यायल सुरू केले. राज्यस्तरावरील नेते कार्यालयात बैठक घेत होते. परंतु, महापालिका निवडणुका लांबल्या.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>>विदर्भावर पुन्हा अवकाळीचे काळे ढग; जाणून घ्या, कुठे किती पाऊस पडणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजित शिरोळे, अमेय खोपकर, महेश जाधव, बाबू वागस्कर यांनी शहरात येत आढावा बैठका घेतल्या. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्ण ताकदीने लढायची आणि जिंकायची असा निर्धार केला. परंतु, आता निवडणूक तोंडावर आली असताना कोणतीही तयारी दिसत नाही. मनसे उमेदवार उभे करणार की नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच पक्षाचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयही बंद झाले. कार्यालयाचे भाडे देण्याची जबाबदारी कोण घेणार? यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. पदाधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने कार्यालयास टाळे लावण्यात आले. केवळ दोन वर्षांत आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यालय बंद झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, की गाळा मालकाने अचानक भाडेदर वाढविला. त्यामुळे कार्यालय बंद केले. नवीन ठिकाणी पक्ष कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

Story img Loader