पिंपरी- चिंचवडच्या सांगवी मध्ये महिलेच्या डोक्यात हातोडा मारून महिलेच्या गळ्यातील सोन साखळी घेऊन चोरट्याने पळ काढण्याची घटना उघडकीस आली आहे. दुपारी चार ते पाच च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस, गुन्हे शाखा आणि गुंडा विरोधी पथक अधिक तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी वरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने पन्नास वर्षीय महिलेच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी करून गळ्यातील सोनसाखळी चोरली. घटनेनंतर अज्ञात आरोपी हा पसार झाला आहे. अज्ञात आरोपी हा हेल्मेट परिधान करून आणि तोंडाला फडके बांधून आला होता. अज्ञात व्यक्तीचा नेमका हेतू काय होता?. सोन साखळी चोरणे होता की आणखी काही. याबाबतचा पोलीस तपास करत आहेत. ही घटना सांगवी येथी महाराष्ट्र बँक चौकात घडली आहे. घटनास्थळी सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखा आणि गुंडाविरोधी पथक दाखल झालेल आहे. जखमी झालेल्या पन्नास वर्षीय महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून ती सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच महिला श्रीकृष्ण नगर येथे राहण्यास आली होती. अशी माहिती समोर येत आहे.