लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल ३० जूनपर्यंत प्रसिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर न होण्याबाबत एका अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्याबाबतचा अहवाल तत्काळ उच्च शिक्षण संचालनालयाकडे पाठवण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना दिले.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्यपालांनी कुलगुरूंची बैठक घेऊन सत्र परीक्षांचे निकाल सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार किमान ३०, तर कमाल ४५ दिवसांत जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त केवळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाच्या सत्र परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. या तीनही विद्यापीठांचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर होणार आहेत. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निकाल येत्या ३१ जुलैपर्यंत जाहीर होणार नसल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिली.

हेही वाचा… आला पावसाळा, आरोग्य सांभाळा!… हवामानातील बदलामुळे साथरोगांमध्ये वाढ

परराज्यात आणि परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सत्र परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर होणे गरजेचे असते. निकालास विलंब झाल्याने प्रामुख्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राबवण्यात येणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होत आहे. एका विद्यापीठाचा निकाल रखडल्यास त्याचा संपूर्ण परिणाम प्रामुख्याने सीईटी सेलच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवर होतो. याची कल्पना असूनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल ३० जूनपर्यंत जाहीर न होणे प्रशासकीयदृष्ट्या खेदजनक आहे. त्यामुळे निकाल जाहीर न करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत डॉ. देवळाणकर यांनी नमूद केले आहे.

एकावर कारवाई करणे कितपत उचित?

गेल्यावर्षी सीईटी सेलतर्फे विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया साधारणपणे नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. शैक्षणिक वर्षात एका सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी नव्वद दिवसांचा कालावधी देऊन परीक्षा घेण्याचा नियम आहे. परिणामी विद्यापीठाच्या परीक्षांना विलंब झाला. त्यामुळे सीईटी सेलची प्रवेश प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू राहण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागही जबाबदार आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निकाल विलंबाने जाहीर झाल्याबाबत एकाच अधिकाऱ्यावर कारवाई करणे कितपत उचित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.