पुण्यातील कोंढवा भागात आई वडिलांनी ११ वर्षाच्या पोटच्या मुलाला दोन वर्षापासून तब्बल २२ कुत्र्यांसोबत एका रूममध्ये डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आई वडिलांविरोधात बालन्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम सन २०० चे कलम २३, २८ प्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय लोधरिया आणि शितल लोधरिया असे आरोपी आई वडिलांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील कृष्णाई इमारतीमध्ये संजय लोधरिया आणि शितल लोधरिया राहतात आहे. ते राहत असलेल्या घरात २० ते २२ कुत्री आहेत. त्या घरातून खूप वास येत आहे. कुत्री असलेल्या खोलीत ११ वर्षाचा मुलगा जवळपास दोन वर्षापासून राहत आहे. तो मुलगा खिडकीत बसतो आणि कुत्र्यासारखे वर्तण करतो. चाईल्ड लाईन संस्थेच्या समन्वयक अपर्णा मोडक यांना एकाने फोनवरून याबाबत माहिती दिली.


त्या माहितीच्या आधारे त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली. तेव्हा एका रुममध्ये ११ वर्षाचा मुलगा होता आणि त्याच्या आजूबाजूला विविध वयोगटाची २० ते २२ कुत्री आढळून आली. तो मुलगा बेडवर झोपलेल्या अवस्थेत होता. त्यावेळेस अपर्णा मोडक यांनी मुलाच्या आईवडिलांना अशाप्रकारे मुलाला ठेवल्यास त्याच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो, असे सांगत मुलाच्या आरोग्याबाबत जनजागृती केली आणि ते निघून गेल्या. मात्र, काही दिवसांनी जाऊन पाहिले असता परत तोच प्रकार दिसून आला. त्यानंतर मोडक यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी वडील आणि आई यांची चौकशी सुरू आहे. तसेच त्या मुलाचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The parents kept the child with 22 dogs in one room from 2 years in pune dpj