मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देणाऱ्या एकास लोणावळ्यातून ताब्यात घेण्यात आले.अविनाश अप्पा वाघमारे (वय ३६, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर, साठे चाळ, घाटकोपर, मुंबई) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. वाघमारे लोणावळ्यातील एका हॅाटेलमध्ये रविवारी (२ ऑक्टोबर) दुपारी आला होता. हॅाटेलमध्ये त्याने दारु प्याली.
हेही वाचा >>> राज्यात हंगामातील पाऊस सरासरीपुढेच; जाणून घ्या तुमच्या भागात किती पाऊस पडणार
पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याने त्याने हॅाटेलमधील व्यवस्थापक आणि कामगारांशी वाद घातला. दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्कही साधला. हॅाटेलचे नाव सांगून वाघमारेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांच्या पथकाने वाघमारेला ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांनी याबाबत तपास करीत त्याला समज देऊन सोडून देण्यात आले.