पुणे : मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलेल्या आणि ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘बेईमान’ या नाटकाचा रंगभूमीवर शुभारंभाचा प्रयोग झाला, ही घटना गुरुवारी (३ नोव्हेंबर) सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. हे औचित्य साधून नव्या संचामध्ये समीप मंचाचा अनुभव देत ‘द बाॅक्स’ येथे ‘पुनर्भेट’ उपक्रमांतर्गत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग गुरुवारी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुरंदर विमानतळाच्या विरोधावर कौशल्य विकासाची ‘मात्रा’; प्रकल्पग्रस्तांना भविष्यातील रोजगारांत सामावून घेण्यासाठी वयोगटानुसार विश्लेषण सुरू

वसंत कानेटकर यांनी ‘बेकेट’ या फ्रेंच नाटकाचा ’बेईमान’ या नावाने मराठी अनुवाद केला. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर आणि सतीश दुभाषी या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या जुगलबंदीने गाजलेल्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ३ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला होता. ही घटना गुरुवारी सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. या नाटकाचे निर्माते स्वतः प्रभाकर पणशीकर होते. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बेईमान’ नाटकाचे त्या काळी तब्बल ३६८ प्रयोग झाले होते. हे गाजलेले नाटक खूप वर्षे बंद होते. सुयोग नाट्यसंस्थेचे सुधीर भट यांनी या नाटकाचे पुनरुज्जीवन केले होते. मंगेश कदम यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकामध्ये शरद पोंक्षे, तुषार दळवी आणि शीतल क्षीरसागर मुख्य भूमिकेत होते.

हेही वाचा >>> शासकीय अनास्थेमुळे रायगडावरील पर्यटन महामंडळाच्या निवासस्थानाचे नूतनीकरण रखडले

कानेटकर यांचे ‘बेईमान’ हे नाटक पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असताना ‘पुनर्भेट’ प्रकल्पातील या नाटकाच्या प्रयोगासह हा दिवस ३ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे, अशी माहिती ‘द बाॅक्स’चे प्रमुख आणि नव्या संचातील नाटकाचे दिग्दर्शक प्रदीप वैद्य यांनी दिली. केवळ स्मरणरंजन नाही, तर नव्या दमाच्या अभिनेत्यांना त्या काळच्या उत्तमोत्तम भूमिका नव्या ऊर्जेने सादर करता याव्यात आणि रसिकांना पाहता याव्यात यासह सादरीकरणाच्या नव्या दिशा, नवे विचार घेऊन समीप किंवा आधुनिक सादरीकरण करण्यासाठी या संहितेचा नव्याने अभ्यास व्हावा हे उद्देश यामागे आहेत. जुन्या गाजलेल्या तब्बल दहा नाटकांची अशी नूतन स्वरूपातील पुनर्भेट घडवणारा हा प्रकल्प ‘बेईमान’ या अजरामर नाटकाने सुरू करण्यात येत आहे. त्यामध्ये अधीश पायगुडे आणि श्रीकांत प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देत बहुमुखी रंगमंच मांडणीसह दीर्घांक स्वरूपात साधारण दीड तासाचा प्रयोग होणार आहे, असे वैद्य यांनी सांगितले.