लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: नर्तिकेच्या घरातून १३ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून पसार झालेल्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले. आरोपीकडून १२ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
शुभम अशोक माने (वय २३, रा. सुंदरतीर्थ अपार्टमेंट, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी कात्रज भागात राहायला असून ती मूळची धाराशिव जिल्ह्यातील आहे. ती नर्तिका आहे. २६ जून रोजी ती गुजरातला एका कार्यक्रमासाठी गेली होती. गुजरातहून रविवारी (९ जुलै) ती पुण्यात परतली. तेव्हा घरातील कपाट उचकटल्याचे आढळून आले. कपाटातील रोकड आणि साडेसात लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली.
हेही वाचा… अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, पहिली निवड यादी २५ जुलैला
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात शुभम माने याने नर्तिकेच्या घरातून ऐवज चोरल्याची माहिती पोलीस कर्मचारी राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिली. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, सचिन सरपाले, आशिष गायकवाड, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे आदींनी ही कारवाई केली.