पुणे : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी बस रॅपीड ट्रान्झिट- बीआरटी सेवा सुरू करण्यात आली असली तरी शहरातील वाहतूक कोंडीला बीआरटी मार्ग कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी या वाहतूक कोंडीचे खापर महापालिकेवर फोडले आहे. वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर, सर्व बीआरटी मार्ग बंद करा आणि अनावश्यक सायकल मार्ग काढून टाका, असे पत्र पोलिसांनी महापालिकेला पाठविले आहे.

हेही वाचा >>>पुणे : प्रदीप शर्मांचा मुक्काम तीन महिने ससून रुग्णालयात

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट

शहरात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यावरून वाहतूक पोलिसांवर टीका होत आहे.शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतुकीस बंदी आहे. मात्र त्यानंतरही अवजड वाहने शहरात येत आहेत. तसेच बस, रिक्षा त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी थांबत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यानुसार अवजड वाहने शहरात प्रवेश करताना त्यांना वाहतूक पोलिसांनी अटकाव करावा आणि बस, रिक्षा यांना योग्य त्या ठिकाणी थांबे देण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र त्यासंदर्भात उपाययोजना करण्याऐवजी वाहतूक कोंडीचे खापर पोलिसांनी महापालिकेवरच फोडले आहे.

हेही वाचा >>>पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने भोसकून खून

शहरातील चोवीस रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच बीआरटी मार्ग आणि सायकल मार्गांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे, असा दावा पोलिसांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे.नगर रस्ता, सोलापूर रस्ता आणि सातारा रस्त्यावर महापालिकेने बीआरटी मार्ग सुरू केला आहे. यातील नगर रस्ता हा राज्य मार्ग असून सोलापूर आणि सातारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहेत. बाहेरील जिल्ह्यातून मुंबई, नगर, सोलापूर आणि सातारा येथे जाणारी वाहने शहरातून याच मार्गावरून जातात. या मार्गांवर जड वाहनांची वाहतूक मोठी आहे. या रस्त्यांवर बीआरटी मार्ग असल्याने बीआरटी मार्ग सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी वापरला जात आहे. त्याचा ताण उर्वरित रस्त्यांवर येत असून लहान मोठे अपघात होण्याबरोबरच वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत बीआरटी मार्ग आणि सायकल मार्ग काढल्यास वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य आहे, असे पोलिसांनी या पत्रात नमूद केले आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच वेगवान वाहतुकीचे शाश्वत साधन उपलब्ध व्हावे, यासाठी पंधरा वर्षांपूर्वी बीआरटी योजना सुरू करण्यात आली. मात्र विविध कारणांमुळे बीआरटी मार्ग पंधरा वर्षानंतरही प्रायोगिक तत्त्वावरच राहिला आहे. मृत्युशय्येवर असलेल्या बीआरटी मार्ग काही ठरावीक अंतरातच सुरू आहेत. बीआरटी मार्गातून खासगी वाहनांची घुसखोरीही होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बीआरटी मार्ग सक्षम करावा, अशी मागणी वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पुणे : मूल्य साखळीचा विकास गरजेचा ; केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे प्रतिपादन

८०३ वाॅर्डनची नियुक्ती
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका, मेट्रो आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे आणि पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांना ८०३ वाॅर्डन उपलब्ध करून दिले आहेत. ज्या भागामध्ये प्रकल्पांच्या कामांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे, तसेच गर्दीच्या चौकांमध्ये जेथे मनुष्यबळाअभावी वाहतूक नियमन करणे अडचणीचे ठरत आहे, त्या ठिकाणी वाॅर्डनची नियुक्ती केली जाणार आहे. तीन ते चार दिवसांत टप्प्याटप्प्याने वाॅर्डन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे आणि पिंपरी-चिचंवडसाठी प्रत्येकी ३३, महामेट्रोने २६४, पीएमआरडीएने दिवस आणि रात्रपाळीमध्ये ४१६, गोल्फ कल्बने ३७ आणि सिंहगड उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंपनीने २० वाॅर्डन पुरविले आहेत.

Story img Loader