पुणे : महाविद्यालयीन रंगकर्मीच्या नाटय़गुणांना वाव देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा उद्या, शनिवारपासून पुणे, कोल्हापुरातून सुरू होत आहे. पुणे विभागाची प्राथमिक फेरी दोन दिवस मुकुंदनगर येथील सकळ ललित कला घर येथे रंगणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही या स्पर्धेला महाविद्यालयीन रंगकर्मीनी भरभरून प्रतिसाद दिला असून, प्राथमिक फेरीतील दमदार सादरीकरणासाठी रंगकर्मी सज्ज झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यव्यापी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आहे. राज्यभरातील रंगकर्मीचे या स्पर्धेकडे लक्ष लागलेले असते. प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी आणि महाअंतिम फेरी अशा तीन टप्प्यांत ही स्पर्धा होते. यंदाच्या स्पर्धेचे बिगूल वाजले असून, नाटय़मंच सजला आहे.

 ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या पुणे विभागाची प्राथमिक फेरी २५ आणि २६ नोव्हेंबर या कालावधीत मुकुंदनगर येथील सकळ ललित कला घर येथे होणार आहे. या फेरीतील सर्वोत्कृष्ट संघांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे. त्यामुळे प्राथमिक फेरीत दमदार सादरीकरण करून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी रंगकर्मी उत्सुक आहेत.

हेही वाचा >>>खासदार सुप्रिया सुळेंनी जेजुरीत घेतला ‘पॅरामोटरिंग’चा आनंद, १२०० फुटांवरुन पाहिला जयाद्री पर्वत आणि कडेपठार

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे हे आठवे पर्व आहे. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वापासून ‘सॉफ्ट कॉर्नर’ ‘लोकसत्ता’बरोबर आहे, याचा अतिशय आनंद आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातील युवकांनाही आपले नाटय़गुण सिद्ध करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ ‘लोकसत्ता’मुळे उपलब्ध झाले आहे. त्यामुळेच ‘सॉफ्ट कॉर्नर’ या उपक्रमाशी जोडले गेले आहे. दूरचित्रवाणी आणि चित्रपट क्षेत्रातील कामाच्या संधीची कवाडे खुली करून देणारी एकांकिका स्पर्धा, असा लौकिक प्राप्त केलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ उपक्रमास शुभेच्छा.-दिलीप कुलकर्णी, सॉफ्ट कॉर्नर

मुख्य प्रायोजक 

’सॉफ्ट कॉर्नर

सहप्रायोजक

’भारती विद्यापीठ, पुणे

’शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिग अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट

पॉवर्ड बाय 

’केसरी टूर्स

’शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ मर्या, विजयनगर-अकलूज, ता. माळशिरस जि. सोलापूर

’श्री नेमिनाथ ज्वेलर्स

साहाय्य

’अस्तित्व

टॅलेंट पार्टनर

’आयरिस प्रॉडक्शन

प्राथमिक फेरीचे वेळापत्रक

२५ आणि २६ नोव्हेंबर पुणे, कोल्हापूर

२९ व ३० नोव्हेंबर-नागपूर

२ आणि ३ डिसेंबर मुंबई, ठाणे, नाशिक

४ आणि ५ डिसेंबर – छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The preliminary round of lokankika starts tomorrow amy