मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटो, काकडी, फ्लाॅवर या फळभाज्यांच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२९ जानेवारी) राज्य; तसेच परराज्यांतून १०० ते ११० ट्रक फळभ्जयांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, राजस्थानातून ९ ते १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून मिळून १५ टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, बंगळुरुतून ३ टेम्पो आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ९ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ४० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे: टोमॅटो, काकडी, फ्लाॅवरचे भाव झाले स्वस्त; अंबाडी, पालकाचे दर कडाडले
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटो, काकडी, फ्लाॅवर या फळभाज्यांच्या दरात घट झाली.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-01-2023 at 16:21 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The prices of tomatoes cucumbers and flowers have become cheaper pune print news rbk 25 amy