मार्केट यार्डातील घाऊक बाजारात बटाटा, टोमॅटो, ढोबळी मिरची, शेवगा, मटारच्या या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१६ ऑक्टोबर) राज्य; तसेच परराज्यांतून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १४ ते १५ ट्रक हिरवी मिरची, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, इंदूरहून २ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १२ ते १३ ट्रक लसूण, गुजरातमधून ३ ते ४ टेम्पो भुईमूग शेंग, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ३० ते ४० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.पुणे विभागातून सातारी आले ११०० ते १२०० गोणी, कोबी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो सात ते आठ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, शेवगा २ टेम्पो, मटार ३० ते ४० गोणी, कांदा ११० ट्रक अशी आवक झाली.

हेही वाचा >>>पुणे : उधारीवर दारू न दिल्याने मद्यालयाच्या मालकावर हल्ला ; सिंहगड रस्ता भागातील घटना; सराईत गुन्हेगारासह साथीदार फरार

मेथी, पुदिना, अंबाडी, राजगिऱ्याच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील तरकारी विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत मेथी, पुदिना, मुळा, अंबाडी, राजगिरा या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. कांदापात, चाकवत, चुका या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. कोथिंबिर, करडईचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात काेथिंबिरीच्या दोन लाख जुडी; तसेच मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली.

मोसंबी, खरबूज, लिंबू, कलिंगड महाग
फळबाजारात मोसंबी, खरबूज, लिंबू, कलिंगडच्या दरात वाढ झाली. पेरुच्या दरात घट झाली. पपई, सीताफळ, अननस, चिकू, डाळिंब, संत्र्यांचे दर स्थिर आहेत. कलिंगड, खरबूजची आवक घटल्याने दरात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली. मोसंबीच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली. लिंबाच्या दरात गोणीमागे ५० रुपयांनी वाढ झाली. फळबाजारात लिंबू दीड ते दोन हजार गोणी, डाळिंब ३५ ते ४० टन, पपई ९ ते १० टेम्पो, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, पेरु १००० ते १२०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), अननस ४ ट्रक, मोसंबी ५० ते ६० टन, संत्री २० ते ३० टन, सीताफळ २० ते २५ टन, चिकू ६०० पेटी अशी आवक झाली, अशी माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे : शेअर बाजारातील गुंत‌वणुकीच्या आमिषाने नऊ लाखांचा गंडा ; महिलेच्या विरोधात गुन्हा

मटण, चिकन. मासळीला मागणी
नवरात्रोत्सवानंतर मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वी रविवारी खवय्यांची मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी गर्दी झाली होती. मासळीच्या दरात वाढ झाली आहे. चिकन, मटणाचे दर स्थिर आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्र, खाडीतील, नदीतील मासळीची तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन मासळीची आवक झाली.

Story img Loader