मार्केट यार्डातील घाऊक बाजारात बटाटा, टोमॅटो, ढोबळी मिरची, शेवगा, मटारच्या या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१६ ऑक्टोबर) राज्य; तसेच परराज्यांतून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १४ ते १५ ट्रक हिरवी मिरची, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, इंदूरहून २ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १२ ते १३ ट्रक लसूण, गुजरातमधून ३ ते ४ टेम्पो भुईमूग शेंग, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ३० ते ४० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.पुणे विभागातून सातारी आले ११०० ते १२०० गोणी, कोबी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो सात ते आठ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, शेवगा २ टेम्पो, मटार ३० ते ४० गोणी, कांदा ११० ट्रक अशी आवक झाली.
पुणे : बटाटा, टोमॅटो, ढोबळी मिरची, शेवगा, मटारच्या दरात वाढ
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात बटाटा, टोमॅटो, ढोबळी मिरची, शेवगा, मटारच्या या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-10-2022 at 17:12 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The prices of vegetables increased in the wholesale market in the market yard pune print news amy