पुणे : अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) ‘क्यूब्स इन स्पेस’ प्रोग्रामसाठी पुण्यातील रोहन भंसाली या विद्यार्थ्याच्या प्रकल्पाची निवड झाली आहे. अंतराळ उड्डाणात मानव, वस्तू आणि पेलोड्सचे उच्च तीव्रतेच्या सौर अतिनील विकिरणांपासून संरक्षण करण्यातील अडथळ्यांचा अभ्यास रोहनच्या प्रकल्पाद्वारे करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहन आणि त्याची आई डॉ. कविता भंसाळी यांनी प्रकल्पाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. रोहन विद्या व्हॅली शाळेत सहावीत शिकत आहे. नासाच्या ‘क्यूब्स इन स्पेस’ या कार्यक्रमात जगभरातील ११ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लघु उपग्रहाची रचना, निर्मिती साठी करण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्यानुसार रोहनने त्याचा प्रकल्प सादर केला. अंतराळ उड्डाणात मानव, वस्तू आणि पेलोड्सचे उच्च तीव्रतेच्या सौर अतिनील विकिरणांपासून संरक्षण करण्यासाठीचा प्रकल्प रोहनने तायर केला. त्यात ४ बाय ४ सेमी क्यूबमध्ये ४ यु.वी सेन्सर्स, ३ निवडक साहित्य (रेशीम, अॅल्युमिनियम, प्लास्टिक) आणि स्ट्रॅटोस्फियरमध्ये बारा तासांच्या प्रवासाच्या प्रत्येक ५ मिनिटांनी डेटा लॉग करण्यासाठी एक मायक्रोप्रोसेसर आहे. स्ट्रॅटोस्फिअर वातावरणातील 1 लाख 64 हजार फूट उंचीवर असतो. तर विमाने सर्वसाधारणपणे तीस हजार फूट उंचीवरून उडतात.

हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण

निवडीबाबत आनंद व्यक्त करून रोहन म्हणाला, की मला विज्ञानाची आवड असल्याने या प्रकल्पात सहभागी होण्याचे ठरवले. तसेच शाळा आणि पालकांनीही प्रोत्साहन दिले. मला विज्ञानातील नवनव्या संकल्पना समजून घ्यायला आवडतात. त्यामुळे तीन ते चार महिने अभ्यास करून उपकरण तयार केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The project of a student studying in class 6 in pune has been selected by nasa pune print news ccp 14 amy
Show comments